Posts

Showing posts with the label Teachers handbook

प्रवास सातपुड्याचा - नंदुरबार डाएट ने तयार केलेली भिली, कोकणी, मावची, कोठली आणि पावरी अशा पाच बोलीभाषेतील शिक्षक शिक्षक हस्तपुस्तिका

Image
प्रवास सातपुड्याचा - नंदुरबार डाएट ने तयार केलेली भिली, कोकणी, मावची, कोठली आणि पावरी अशा पाच बोलीभाषेतील शिक्षक शिक्षक हस्तपुस्तिका.. ही एकूण ६ भाषेतील व एकूण पाच बोलीभाषा मधिल एकत्रित शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा दोघांचाही विचार करून तयार करण्यात आलेली पुस्तिका आहे. ही पुस्तिका प्रमाणभाषा जाणणाऱ्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची बोलीभाषा समजण्यास मदत करते तर.. विद्यार्थ्यांना ज्यांना बोलीभाषा समजते त्यांना प्रमाणभाषा समजण्यासाठी उपयुक्त ठरेल.. अशी ही दोन्ही बाजूंनी विचार करून बनवलेली नंदुरबार जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था ने तयार केलेली प्रवास सातपुड्याचा पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालिल Download वर क्लिक करा... Download   नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्हा म्हणुन ओळखला जातो. या जिल्ह्यातील पावरी, भिल्ल, कोठली, कोकणी व मावची बोलीभाषेत बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी व ती ती बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ही पुस्तिका अतीशय उपयोगी ठरेल. पाच बोलीभाषा एकत्रित करून तयार केलेली ही पुस्तिका कदाचित एकमेव पुस्तिका असू शकते. परंतू या विद्यार्थ्

यवतमाळ डाएट ने तयार केलेली कोलाम बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी तयार केलेली शिक्षक हस्तपुस्तिका

Image
 यवतमाळ डाएट ने तयार केलेली कोलाम बोलीभाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी तयार केलेली शिक्षक हस्तपुस्तिका.... Download वरील Download वर क्लिक करा आणि डाऊनलोड करा संपुर्ण हस्तपुस्तिका... ज्या ज्या शाळेत कोलाम बोलीभाषा बोलणारे विद्यार्थी आहेत त्या शाळेतील शिक्षकांसाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, यवतमाळ ने एक शिक्षक हस्तपुस्तिका तयार केली आहे. ज्यामध्ये कोलामी मराठी आणि इंग्रजी अशा त्रीभाषा वापरून हे पुस्तक विकसित केले आहे.  शब्दां सोबतच काही संभाषणे आणि गीते देखील कोलामी आणि मराठी अशा द्विभाशी पद्धतीने लिहिलेली आहेत. ही हस्तपुस्तिका नक्कीच कोलाम भाषिक विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी व त्यांना शिकवण्यासाठी उपयुक्त ठरेल. जर आपणही एखाद्या बोलीभाषेत विद्यार्थ्यांसाठी काही साहित्य तयार केले असेल तर आपण आम्हाला ९७६५४८६७३५ या whatsapp नंबर वर पाठऊ शकता.. धन्यवाद!